मोटार सायकल अपघातात एक ठार; श्रीधर नगर घाटपुरी येथील घटना
By अनिल गवई | Updated: October 1, 2022 13:19 IST2022-10-01T13:04:13+5:302022-10-01T13:19:33+5:30
डोके आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्याने वसंतराव देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला.

मोटार सायकल अपघातात एक ठार; श्रीधर नगर घाटपुरी येथील घटना
खामगाव: दुचाकीने घरी जात असताना, एका ५० वर्षीय इसमाचा तोल जाऊन झालेल्या रस्ता अपघात पती जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११:३० वाजता घाटपुरी येथील श्रीधर नगर येथे घडली.
खामगाव येथील वसंतराव नामदेवराव देशमुख (५०) हे स्थानिक एमआयडीसीत काम करतात. शनिवारी सकाळी ते एमएच २८ वाय ११०० या दुचाकीने घरी जात होते. दरम्यान, त्यांचा तोल गेल्याने घाटपुरी येथील श्रीधर नगर जवळ त्यांची दुचाकी नालीवर आदळली. यात डोके आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने वसंतराव देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना सामान्य रुग्णालयात आणण्यात आले, तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले