भरधाव कंटनेरच्या धडकेत एक ठार, पिंपळगाव राजा येथील घटना
By अनिल गवई | Updated: September 14, 2022 18:16 IST2022-09-14T18:16:23+5:302022-09-14T18:16:39+5:30
या घटनेनंतर कंटनेर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

भरधाव कंटनेरच्या धडकेत एक ठार, पिंपळगाव राजा येथील घटना
खामगाव: रस्त्याने पायी जात असलेल्या एका तरुणाला भरधाव कंटेनरने पाठी मागून धडक देत चिरडले. यात जागीच तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे दुपारी दोन वाजता दरम्यान घडली.
शाहबाज अब्दुल रफीक हा पिंपळगाव राजा येथील भारतीय स्टेट बँकेतून पायीच घरी जात होता. दरम्यान, खामगाव येथून पिंपळगाव राजा मार्गे मोताळाकडे जात असकलेल्या भरधाव कंटेनरने शाहबाज अब्दुल रफीक याला पाठीमागून जबर धडक देत चिरडले. या घटनेनंतर कंटनेर चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत युवकाला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी युवकाला मृत घोषीत केले. मृतक शाहबाज हा पिंपळगाव राजा येथील कांदा व्यापारी रफीक भाई यांचा मुलगा होता.