वीज कोसळून एक ठार
By Admin | Updated: June 11, 2017 02:24 IST2017-06-11T02:24:41+5:302017-06-11T02:24:41+5:30
पांग्राडोळे परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडाटसह पाऊस सुरु होता.

वीज कोसळून एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार (जि. बुलडाणा) : तालुक्यातील पांग्राडोळे येथे शेतातील घरासमोर पाणी भरत असताना वीज कोसळल्याने देविदास चंद्रभान नरवाडे (४७) यांचा १0 जून रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला .
पांग्राडोळे परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडाटसह पाऊस सुरु होता. घराच्या टीनावरुन पडत असलेले पावसाचे पाणी घरात वापरण्यासाठी भरत असताना अचानक अंगावर वीज कोसळली. या अपघातात देविदास नरवाडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.