दुचाकी झाडावर आदळून एक ठार

By Admin | Updated: June 28, 2014 01:43 IST2014-06-28T01:26:41+5:302014-06-28T01:43:00+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील अपघात

One killed in a bicycle and killed | दुचाकी झाडावर आदळून एक ठार

दुचाकी झाडावर आदळून एक ठार

सिंदखेडराजा : येथील जय भवानी जिनिंग फॅक्र्टीजवळील लिंबाच्या झाडावर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २७ जून रोजी दुपारी २.३0 वाजता दरम्यान घडली.
लोणार तालुक्यातील वडगांव तेजन येथील नवनाथ आत्माराम म्हस्के (३१) हा एम.एच. २0 सी.क्यू. २२0९ क्रमांकाच्या दुचाकीने वडगांव तेजन येथून औरंगाबाद जात होता. येथील जिनिंग फॅक्र्टीजवळ रस्त्याच्याकडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर त्याची दुचाकी आदळली. त्यामध्ये नवनाथ म्हस्के हा जागेवरच ठार झाला. त्याच्या पश्‍चात पत्नी व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिस तपास सुरू होता.

Web Title: One killed in a bicycle and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.