ट्रेलर-ऑटो अपघातात एक ठार, दोन जखमी

By Admin | Updated: February 11, 2015 23:52 IST2015-02-11T23:52:03+5:302015-02-11T23:52:03+5:30

जळगाव जामोद येथे अपघात.

One killed and two injured in a trailer-auto accident | ट्रेलर-ऑटो अपघातात एक ठार, दोन जखमी

ट्रेलर-ऑटो अपघातात एक ठार, दोन जखमी

जळगाव जामोद (बुलडाणा): भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने ऑटोतील एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथे १0 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा घडली.
प्राप्त माहितीनुसार, पोकलॅन घेऊन जाणार्‍या ट्रेलर क्रमांक एम एच ४३ ई ८५३१ ने समोरून येणार्‍या अँपे ऑटो क्रमांक एम एच १९ ई ८७३४ या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये अँपे ऑटोमधील सवार दशरथ रूपचंद्र पाटील (62) रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर जागीच ठार झाले. तर या ऑटोतील दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना मलकापूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार मुक्ताईनगर परिसरातील चारठाणा येथील नागरिक आसलगाव येथील मरिमातेच्या दर्शनासाठी जात होते. तर ट्रेलर पोकलॅन्ड घेवून पिंपळगाव काळे येथून पळशी सुपो येथे खोदकाम करून खामगावकडे परत होता. याप्रकरणी ऑटो चालक गजानन दशरथ बेलदार यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी ट्रेलर चालक सुनिल रामकृष्ण इंगळे (अटाली ता. खामगांव) या विरोधात कलम २७९,३३७,३३८,३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: One killed and two injured in a trailer-auto accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.