अपघातात एक जण ठार; एक जखमी
By Admin | Updated: May 23, 2016 01:37 IST2016-05-23T01:37:31+5:302016-05-23T01:37:31+5:30
मेहकर सिंदखेड राजा मार्गावरील अपघात.

अपघातात एक जण ठार; एक जखमी
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): मेहकर-सिंदखेडराजा मार्गावरील तुळजापूर फाट्यानजीक मोटारसायकल व कारची धडक होऊन मोटारसायकलवरील एक जण ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना २२ मे रोजी दुपारी ४ वाजतादरम्यान घडली आहे. येथील बिपीन मोतीलाल मेहेर (१८) व गणेश लकवाळ (२0) हे दोघे एम.एच.२८ यु. ७५६ क्रमांकाच्या मोटारसायकलने जालन्यावरून सिंदखेडराजाकडे येत होते. दरम्यान, सिंदखेडराजावरून जालन्याकडे जाणार्या एम.एच.२८ सी.५३२२ क्रमांकाच्या इंडिका कारला तुळजापूर फाट्यानजीक त्यांच्या मोटारसायकलची धडक बसली. यामध्ये बिपीन मेहेर हा जागीच ठार झाला. तर मंगेश लकवाळ हा गंभीर जखमी झाला आहे.