मेहकर-चिखली मार्गावर अपघातात एक ठार; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 11:42 AM2020-09-19T11:42:55+5:302020-09-19T11:43:06+5:30

हा अपघात शिवाजीनगर फाट्यानजीक रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला

One killed in accident on Mehkar-Chikhali road; Two injured | मेहकर-चिखली मार्गावर अपघातात एक ठार; दोन जखमी

मेहकर-चिखली मार्गावर अपघातात एक ठार; दोन जखमी

Next

हिवरा आश्रम: मेहकर-चिखली मार्गावर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागील बाजूने कारची जबर धडक लागून झालेल्या अपघातामध्ये १७ सप्टेंबर रोजी रात्री एक जण ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.
हा अपघात शिवाजीनगर फाट्यानजीक रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री मेहकर-चिखली मार्गावर शिवाजीनगर फाट्यानजीक दहा टायरचा ट्रक उभा होता. यावेळी धुळ््यावरून कारद्वारे गोपाल धुलीचंद वर्मा (४५), पुष्पा धुलीचंद वर्मा (६०) आणि चालक रफीक काझी (५०) हे मेहकरकडे जात होते. दरम्यान, रस्त्यालगत उभ्या असलेल्या या ट्रकचा वाहन चालकास अंदाज न आल्याने कार ट्रकवर पाठीमागील बाजूने धडकली. त्यात कारमध्ये समोर बसलेले गोपाल धुलीचंद वर्मा (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुष्पा धुलीचंद वर्मा व रफीक काझी हे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, रस्त्या लगत उभ्या असलेल्या ट्रकचा चालक हा फरार आहे. या प्रकरणी मेहकर पोलिसानी प्रारंभीक तपासावरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मेहकर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी घटनास्थळ हे साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे.

Web Title: One killed in accident on Mehkar-Chikhali road; Two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.