डोंगरशेवली येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
By निलेश जोशी | Updated: August 12, 2023 20:20 IST2023-08-12T20:20:22+5:302023-08-12T20:20:31+5:30
अस्वलाच्या हल्ल्यात दयाराम सोनुने यांच्या डोक्याला इजा झाली आहे. सध्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत

डोंगरशेवली येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
बुलढाणा: डोंगरशेवली शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. दरम्यान गुराख्यानेही त्याच्या जवळील कुऱ्हाडीने अस्वलास प्रतिकार केला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला आहे. सध्या या जखमीवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
चिखली तालुक्यातील डोंगरसेवली येथील दयाराम लक्ष्मण सोनुने हे १२ ऑगस्ट रोजी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गुलदरी शिवारात गेले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास तेथील एका झुडपातून अचानक अस्वल बाहेर आले वत्याने दयाराम सोनुने यांच्यावह हल्ला चढविला. यावेळी सोनुने यांच्याजवळ कुऱ्हाड होती. त्याद्वारे सोनुने यांनी प्रतिकार केला. अस्वल जंगलाच्या दिशेने पसार झाले. अस्वलाच्या हल्ल्यात दयाराम सोनुने यांच्या डोक्याला इजा झाली आहे. सध्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत