अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी
By Admin | Updated: May 26, 2017 01:33 IST2017-05-26T01:33:50+5:302017-05-26T01:33:50+5:30
बुलडाणा : तालुक्यातील डोंगरखंडाळा शिवारात अस्वलाने अचानक हल्ला केल्यामुळे शौचालयास गेलेला इसम गंभीर जखमी झाल्याची घटना २४ मे रोजी सकाळी ५.३० वाजता घडली.

अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तालुक्यातील डोंगरखंडाळा शिवारात अस्वलाने अचानक हल्ला केल्यामुळे शौचालयास गेलेला इसम गंभीर जखमी झाल्याची घटना २४ मे रोजी सकाळी ५.३० वाजता घडली. बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील सुभाष चव्हाण वय ४० हा इसम सकाळी ५.३० वाजता गाव परिसरातील शिवारात शौचालयास गेला होता; मात्र जवळच असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील आलेल्या तीन अस्वलांपैकी एका अस्वलाने चव्हाण यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात गंभीर जमखी झाल्यामुळे चव्हाण यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याबाबत माहिती मिळताच उपवनसंरक्षक बी.टी.भगत , बी.ए.पोल, गणेश झोले यांनी रुग्णालयात भेट देऊन चव्हाण यांना उपचारासाठी १० हजाराची आर्थिक मदत दिली.
गावातील संभाजी विद्यालयाजवळ दुपारी पुन्हा दोन अस्वल दिसल्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही अस्वलास जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले.