टामी मारल्याने एक जखमी

By Admin | Updated: June 26, 2017 10:18 IST2017-06-26T10:18:01+5:302017-06-26T10:18:01+5:30

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत डोक्यात लोखंडी टामीने वार करून एका युवकास जखमी केल्याची घटना शुक्रवारी घडली.

One injured after plummeting | टामी मारल्याने एक जखमी

टामी मारल्याने एक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा: क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत डोक्यात लोखंडी टामीने वार करून एका युवकास जखमी केल्याची घटना शुक्रवारी घडली. सदर प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, जखमी युवकास उपचारार्थ जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचे पाणी घरात शिरत असल्याने इम्रानखान रहीमखान हा युवक घरासमोरील रस्त्यावरील गतिरोधक फोडत असताना पत्रकार जुनेद कुरेशीसह तिघांनी इम्रानशी वाद घातला. यावेळी जुनेदने इम्रानच्या डोक्यावर लोखंडी टामी मारून गंभीर जखमी केले. दरम्यान, अजीमखान रहीमखान (वय ३१) रा. देऊळगावमही यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाबू कुरेशी, जुनेद कुरेशी, करीम कुरेशी सर्व रा. देऊळगावमही यांच्याविरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने युवकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. सदर मारहाणीत डोक्यावर जबर मार लागल्याने इम्रानखान रहीमखान (वय २२) हा युवक जालना येथे उपचारार्थ दाखल असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सहायक पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे तपास करीत आहे.

Web Title: One injured after plummeting