एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष!
By Admin | Updated: June 22, 2016 23:55 IST2016-06-22T23:55:14+5:302016-06-22T23:55:14+5:30
चिखली येथील नवभारत युथ फाउंडेशनने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला.

एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष!
सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा)
नोकरी, व्यवसायासह इतर जबाबदार्या पार पाडूनही सामाजिक कार्याचा वारसा जपता येतो, असा संदेश येथील नवभारत युथ फाउंडेशनने दिला आहे. यातून पावसाळय़ाच्या तोंडावर निसर्ग संवर्धनांतर्गत वृक्ष बिजांच्या वाटपाची त्यांनी मोहीम हाती घेतली आहे.
या फाउंडेशनमधील सदस्यांमध्ये कोणी शासकीय अधिकारी, तर कोणी उद्योगामध्ये आहेत. असे असतानाही त्यांनी एकत्रित येत कृषी, ग्रामीण आणि निसर्ग संवर्धनाच्या सेवेचे व्रत फाउंडेशनच्या माध्यमातून अंगीकारले असून, आठवड्यातील किमान एकदिवस सामाजिक उपक्रमांसाठी वाहून घेणार्या या तरुणांच्या फाउंडेशनने वृक्ष बिजांच्या वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. नोकरी व व्यवसायातील अनेक तरुणांची एकदा गप्पांची मैफल रंगली असता सामाजिक कार्याच्या विषयाने अचानक गंभीर वळण घेतले. आपले सामाजिक योगदान किती? हा प्रश्न सर्वांंनाच अंतर्मुख करणारा ठरला. अखेर सर्वांंनी एकत्रित येत आठवड्यातील सुटीचा दिवस सामाजिक कार्यासाठी देण्याचा निश्चय केला आणि उद्यास आली ह्यनवभारत युथ फाउंडेशनह्ण.
दरम्यान, या फाउंडेशनने कृषी, ग्रामीण आणि निसर्ग संवर्धनाच्या सेवेचे व्रत सामाजिक जाणिवेतून स्वीकारले. त्यात पावसाळय़ाच्या तोंडावर निसर्ग संवर्धनांतर्गत वृक्ष लागवडीला प्रथम प्राधान्य देण्यात आले असून, सलग गेल्या तीन आठवड्यांपासून दर रविवारी वृक्ष बीज वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्यएकच लक्ष्य, दोन कोटी वृक्षह्ण अशी प्रतिज्ञा केलेल्या या मंडळातील सदस्यांनी तिसर्या रविवारी १९ जून रोजी एक अनोखा उपक्रम राबविला.