कोरोनामुळे एकाचा मृत्यू, ३७ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST2021-06-17T04:24:21+5:302021-06-17T04:24:21+5:30

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील पाच, खामगाव सात, शेगाव एक, देऊळगाव राजा दोन, चिखली पाच, मेहकर एक, मलकापूर एक, ...

One dies due to corona, 37 positive | कोरोनामुळे एकाचा मृत्यू, ३७ जण पॉझिटिव्ह

कोरोनामुळे एकाचा मृत्यू, ३७ जण पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील पाच, खामगाव सात, शेगाव एक, देऊळगाव राजा दोन, चिखली पाच, मेहकर एक, मलकापूर एक, नांदुरा चार, लोणार तीन, जळगाव जामोद सहा, सिंदखेड राजा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. दरम्यान मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोना बाधित आढळून आलेला नाही.

उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील पिंपळगाव येथील ८४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे ६० बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना १६ जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ३७ हजार २८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच एकूण बाधितांपैकी आजपर्यंत ८५ हजार ३१० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

-- १,४७६ अहवालांची प्रतीक्षा--

अद्यापही १ हजार ४७६ संदिग्धांचे अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८६ हजार ८० झाली आहे. त्यापैकी ११९ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ६५१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

Web Title: One dies due to corona, 37 positive