विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
By Admin | Updated: April 19, 2017 00:10 IST2017-04-19T00:10:43+5:302017-04-19T00:10:43+5:30
संग्रामपूर: तालुक्यातील आकोली बु. येथील एका ४५ वर्षीय इसमाचा नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
संग्रामपूर: तालुक्यातील आकोली बु. येथील एका ४५ वर्षीय इसमाचा नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली.
आकोली बु. येथील भाऊराव विश्वनाथ भटकर यांचे नवीन घराचे बांधकाम सुरू होते. दरम्यान, या घराच्या नवीन बांधकामावर पाणी मारत असताना इलेक्ट्रिक वायर विद्युत वाहिनी व होल्डर हे पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले; मात्र त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, आई, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे.