नागरी सहकारी बँक संचालकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:50+5:302021-02-05T08:31:50+5:30

नुकताच बदल झालेला बँकिंग विनियमन कायदा- १९४९ (बँकिंग रेगुलेशन अ‍ॅक्ट) यामध्ये नव्याने समावेश करण्यात आलेल्या तरतुदी त्यामुळे नागरी सहकारी ...

One day workshop for civic co-operative bank directors | नागरी सहकारी बँक संचालकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

नागरी सहकारी बँक संचालकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

नुकताच बदल झालेला बँकिंग विनियमन कायदा- १९४९ (बँकिंग रेगुलेशन अ‍ॅक्ट) यामध्ये नव्याने समावेश करण्यात आलेल्या तरतुदी त्यामुळे नागरी सहकारी बँकांच्या कार्यप्रणाली व कामकाजावर होणारा परिणाम व बदल, भविष्यातील आव्हान या कार्यशाळेमध्ये चर्चिल्या जाणार आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट (नागरी सहकारी बँकांसाठी व्यवस्थापन समिती) या समितीची भविष्यातील कामकाजाची पद्धत कशी असेल, याव्यतिरिक्त नागरी सहकारी बँकेचे संचालक म्हणून काय काम करावे किंवा करू नये, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बँकिंग व्यवसाय कसा वाढवावा व सॉफ्टवेयरचा उपयोग करून कमी वेळेत जास्तीत जास्त काम कशा पद्धतीने केले जाऊ शकते, यासह अनेक विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी, गॅलेक्सी इन्मा सि. प्रा. लि. पुणे या संस्थेचे संचालक अशोक नाईक, योगेश परळकर, महेश देशपांडे यासारख्या बँकिंग क्षेत्रामधील तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. (वा. प्र.)

Web Title: One day workshop for civic co-operative bank directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.