एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 17:55 IST2019-05-13T17:55:33+5:302019-05-13T17:55:40+5:30
डोणगाव: विठ्ठलवाडी येथे एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी समोर आली.

एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या
डोणगाव: विठ्ठलवाडी येथे एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी समोर आली. यामध्ये एका युवकाने गळफास घेऊन तर दुसºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विठ्ठलवाडी येथे एकाच दिवशी दोन युवकांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. १३ मे रोजी सकाळी साडेआठ वाजतापूर्वी विठ्ठलवाडी येथील संदीप सदाशिव शेवाळे (३०) याने विठ्ठलवाडी शिवारात कुंदन देशमुख यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी महादेव चंद्रभान शेवाळे यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशनला आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.
तर विठ्ठल वाडी येथील सुर्यकांत वसंतराव जाधव याने विठ्ठल वाडी शिवारातील स्वत:च्या शेतात हआंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. उमाकांत वसंतराव जाधव यांच्या फिर्यादीवरून डोणगाव पोलीस स्टेशन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली एकाच दिवशी व एकाच गावात दोन घटना घडल्याने गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (वार्ताहर)