शेगाव तालुक्यातील ५८ गावांसाठी एक कोटीचा निधी मंजूर
By Admin | Updated: January 31, 2015 00:50 IST2015-01-31T00:50:28+5:302015-01-31T00:50:28+5:30
दलित वस्त्यांसाठी शासनाने १ कोटी ७ लक्ष रुपयांच्या निधी मंजूर.

शेगाव तालुक्यातील ५८ गावांसाठी एक कोटीचा निधी मंजूर
शेगाव (जि. बुलडाणा): शेगाव तालुक्यातील ५८ गावांमधील दलित वस्त्यांसाठी शासनाने १ कोटी ७ लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरात दिली असून, तालुक्यातील या गावांमध्ये लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. शेगाव पंचायत समिती अंतर्गत दलित वस्ती असलेल्या गावांकडून रस्ते व नाल्यांसाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले होते. सदर प्रस्ताव पंचायत समितीने जिल्हा परिषदेमध्ये पाठवून पाठपुरावा केल्यानंतर सदर प्रस्तावाला मंजुरात देण्यात आली आहे. या सोबतच विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती- जमातीसाठी तालुक्यात २१ नवीन विहिरी, ५ विहीर दुरुस्ती व १0 इतर लाभांची प्रकरणे याशिवाय समाजकल्याण विभागांतर्गत तालुक्यातील ३८ शेतकर्यांसाठी स्प्रे पंप, २ शेतकर्यांसाठी ३ एचपीच्या मोटारी व ३ शेतकर्यांसाठी ५ एचपीच्या मोटारी, विशेष घटक योजनेंतर्गत १९ लाभार्त्यांना शेळी गट व दुधाळ जणावरे, १७ गावांसाठी सौर पथदिवे आणि गायगाव बु. येथील ३ लाभार्त्यांना ओटीएसपी योजनेंतर्गत नवीन विहिरींना मंजुरात दिली आहे.