अडतमधून दीड लाख लंपास
By Admin | Updated: April 7, 2015 01:52 IST2015-04-07T01:52:27+5:302015-04-07T01:52:27+5:30
खामगावातील घटना; भर दिवसा चोरट्याचा उपद्वय़ाप.

अडतमधून दीड लाख लंपास
खामगाव (जि. बुलडाणा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राजेश भट्टड यांच्या एकता ट्रेडर्स अडत दुकानातून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये लंपास केले. ही घटना ६ एप्रिल रोजी दुपारी घडली. येथील कृउबासमध्ये राजेश भट्टड यांचे एकता ट्रेडर्स नावाने अडत दुकान आहे. दरम्यान, राजेश भट्टड यांनी ६ एप्रिल रोजी सकाळी अडत दुकानामधील क पाटात दीड लाख रुपये आणून ठेवले होते. दुपारी शेतकर्यांना मालाचे पैसे देण्यासाठी कपाट उघडले असता त्यामधील र क्कम लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती शहर पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली. तसेच डीवायएसपी जी. श्रीधर यांनीदेखील घटनास्थळी पाहणी केली.