वाडी येथील चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक, रोख रकमेसह सोन्याचा चपला हार जप्त
By अनिल गवई | Updated: August 25, 2023 14:55 IST2023-08-25T14:54:46+5:302023-08-25T14:55:22+5:30
खम्मगाव: वाडी येथील एका घरात झालेल्या दीड लाखाच्या चोरी प्रकरणात शहर पोलिसांनी एकास अटक केली आहे. चोरीतील ऐवजआणि रोख ...

वाडी येथील चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक, रोख रकमेसह सोन्याचा चपला हार जप्त
खम्मगाव: वाडी येथील एका घरात झालेल्या दीड लाखाच्या चोरी प्रकरणात शहर पोलिसांनी
एकास अटक केली आहे. चोरीतील ऐवजआणि रोख रक्कम देखील शहर पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, खामगाव शहरातील वाडी येथील प्रवीण तायडे यांच्या घरातून रोख ८१०० रुपये आणि सोन्याचा चपलाहार असा एकूण दीड लाखाचा ऐवज चोरी गेला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी तायडे यांच्या तक्रारीवरून गुरुवारी सायंकाळीअज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्हाच्या तपासादरम्यान फिर्यादीच्या संशयावरून योगेश रामेश्र्वर जोहरी (३५ रा. इब्राहिमपूर कोथळी ता.मोताळा ह. मु.वाडी ) याला गुरूवारी रात्री ९ वाजता रात्री त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आली .
त्याच्या ताब्यातून रोख ६००० रुपये व चपला हार जप्त करण्यात आला. प्रवीण तायडे यांच्या पत्नी मुलांना शिकवणीसाठी सोडायला गेल्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून दीड लाखाचा ऐवज लंपास केला होता. शहर पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पो. ना. प्रदीप मोठे, सागर भगत, रवींद्र कन्नर, गणेश कोल्हे, राहुल थारकर, अंकुश गुरुदेव,यांनी केली आहे.