दुचाकीवरून पडून वृद्ध महिला ठार
By Admin | Updated: February 4, 2015 01:29 IST2015-02-04T01:29:17+5:302015-02-04T01:29:17+5:30
खामगाव ते पिंपळगाव राजादरम्यान अपघात.

दुचाकीवरून पडून वृद्ध महिला ठार
खामगाव (बुलडाणा) : दुचाकीवरून पडल्याने वृद्ध महिला ठार झाल्याची घटना काल २ फेब्रुवारी रोजी खामगाव ते पिंपळगाव राजादरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील राहुड येथील अरुणाबाई धरमचंद बोरा (वय ५८) या मुलगा ललित बोरा यांच्यासोबत दुचाकीने राहुड येथे जात होत्या. दरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रानजीक दुचाकीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. यामध्ये अरुणाबाई बोरा या जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना उपचारासाठी स् थानिक सामान्य रुग्णालयात आणण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्या मृत झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आकस्मिक मृ त्यूची नोंद केली आहे. अधिक तपास शिवाजी नगर पोलीस कर्मचारी करीत आहेत.