पंधरावर्षे जुनी वाहने रस्त्यावर

By Admin | Updated: December 22, 2014 23:42 IST2014-12-22T23:42:17+5:302014-12-22T23:42:17+5:30

वाहनांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह : फक्त १0 वाहनांवर कारवाई.

Old vehicles on the roads of Pandharparsha | पंधरावर्षे जुनी वाहने रस्त्यावर

पंधरावर्षे जुनी वाहने रस्त्यावर

बुलडाणा : रस्त्यावर धावणारे खासगी प्रवाशी वाहन सुरक्षीतता तपासन्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची फिटनेस चाचणी घेण्यात येते; मात्र, २00१ पासून नवीन टॅक्सी परवाना देणे बंद असल्यामुळे नवीन वाहन रस्त्यावर आले नाहीत. यामुळे १५ ते २0 वर्ष जूनी खासगी प्रवाशी वाहने आजही जिल्ह्यातील रस्त्यावर धावत आहेत. परिणामी वाहनांच्या फिटनेससह या वाहतून प्रवास करणार्‍या प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहर व जिल्ह्यात खासगी प्रवाशी वाहतूक करणारी हजारो वाहने आहेत. दरवर्षी या वाहनांचा फिटनेस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासला जातो. यात वायु प्रदूषण चाचणी, हेडलाईट चाचणी, व्हील अलायनमेंट चाचणी, ब्रेक चाचणी, चेचीस व बॉडी नंबर चाचणी या कामासाठी आरटीओकडे केली जाते. वाहनचालकांना वायुप्रदूषण केंद्राकडून वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करावे लागते. या निकषावर न उतरणारे वाहन कायमस्वरूपी अनफिट ठरविले जाते.
राज्य शासनाने २00१ मध्ये आदेश काढून मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात टॅक्सी (काली िपली) साठी परवाना देण्याचे बंद केले. यावेळी जिल्ह्यात १७६३ टॅक्सी परमीट असलेले वाहन रस्त्यावर धावत होते. यानंतर कुठलीही नवीन टॅक्सी परमीट वाहने जिल्ह्यातील रस्त्यावर आली नाही. मात्र पंधरावर्ष जुनी वाहने आजही रस्त्यावर धावताना दिसतात. यामुळे जिल्ह्यात अपघाताचे प्रमाणाही वाढत असल्यामुळे वाहनाच्या फिटनेसर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्याशी संबंध साधला असता त्यांनी वाहनांचा फिटनेस तपासण्याची मोहीम सप्टेंबर महिण्यापासून हाती घेण्यात आली असल्याचे सांगीतले. वर्षानुवर्षे वाहनांचा फिटनेस न तपासणार्‍या सदोष वाहनधारकांवर कठोर कारवाई केली जात आहे. वाहनधारकांनी मुदतीत आपल्या वाहनांची फिटनेस तपासणी करून कारवाईपासून स्वत:ची मुक्तता करण्याचे अवाहन त्यांनी यावेळी वाहनधारकांना केले.

*दहा वाहनांवर कारवाई
नांदुरा तालुक्यात १0 डिसेंबर रोजी कालीपिली वाहनातून पडून एक महिला ठार झाली होती. त्यामुळे वाहनाच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.यातुन स्थानिक उपप्रादेशिक विभागाकडून नांदुरा व खामगाव येथे वाहन फिटनेस तपासणी राबविण्यात आली. यात १0 वाहन अनफिट आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Web Title: Old vehicles on the roads of Pandharparsha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.