अज्ञात वाहनाच्या धडकेने वृद्ध ठार

By Admin | Updated: September 22, 2016 01:27 IST2016-09-22T01:27:14+5:302016-09-22T01:27:14+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील घाटपुरी येथील घटना.

Old vehicle killed by an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेने वृद्ध ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने वृद्ध ठार

खामगाव(जि. बुलडाणा), दि. २१- भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ६५ वर्षीय वृद्ध इसम जागीच ठार झाल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्गावरील घाटपुरी येथे घडली. बुधवारी पहाटे शौचास गेलेले सुरेश वासुदेव कुळकर्णी रा. श्रीधरनगर घाटपुरी हे परत येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात कुळकर्णी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाचा मुलगा गजानन कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध कलम ३0४ (अ), २७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच यावेळी अज्ञात वाहनाचा शोध घेऊन वाहनचालकावर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: Old vehicle killed by an unknown vehicle