शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जुन्या हंगामातील तूर, हरभऱ्याचे अनुदान आले नव्या हंगामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:32 IST

आतापर्यंत अुनदानाचे वाटप करण्यात आले आहे; मात्र अद्यापही २ कोटी ७५ लाख ११ हजार ८७३ रुपये अनुदान येणे बाकीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मागील वर्षीच्या हंगामातील तूर व हरभºयाचे अनुदान एक वर्षानंतर नव्या हंगामात प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७०० शेतकऱ्यांना आतापर्यंत अुनदानाचे वाटप करण्यात आले आहे; मात्र अद्यापही २ कोटी ७५ लाख ११ हजार ८७३ रुपये अनुदान येणे बाकीच आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आजही तूरीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, त्यांची आर्थिक उन्नती साधावी, यासाठी शासनाकडून हमीभाव ठरवून दिलेला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आला.परंतू काही शेतकºयांचा तूर व हरभरा रात्रं-दिवस नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी रांगा लाऊनही खरेदी होऊ शकला नाही. ज्या-ज्या शेतकऱ्यांनी तूर व हरभरा नाफेडकडे विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली; परंतू ज्या शेतकऱ्यांकडील तूर व हरभरा खरेदी झाला नाही, त्या शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. दरम्यान, अनेक दिवस प्रतीक्षा करूनही शेतकºयांना तूर व हरभऱ्याचे हे अनुदान मिळाले नव्हते. खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशावेळी तूर व हरभºयाचे अनुदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती.परंतू ती पूर्ण होऊ शकली नाही. आता दुसºया वर्षीचा रब्बी हंगाम सुरू झाला असताना मागील वर्षीच्या तूर व हरभºयाचे अनुदान वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत तुरीचे २० कोटी ९० लाख ९७ हजार २०० रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. तर उर्वरीत २ कोटी ७५ लाख ११ हजार ८७३ रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, शेतकºयांना त्वरेने हे अनुदान मिळावे अशी ओरड होत आहे. ९२ टक्के शेतकऱ्यांना मिळाले हरभरा अनुदानमहाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत हरभरा अनुदानासाठी १ हजार १७३ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी ९२ टक्के म्हणजे १ हजार ९० शेतकºयांना अनुदान देण्यात आले आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यातील २३९, सिंदखेड राजा ७२, मोताळा १७, बुलडाणा १२६, लोणार ३००, शेगाव १२८ व संग्रामपूर तालुक्यातील १५४ शेतकºयांना हरभºयाचे अनुदान देण्यात आले आहे.

अडीच हजार शेतकऱ्यांचे तूरीचे अनुदान रखडले४तूरीच्या अनुदानासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत २१ हजार ६२० शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी १७ हजार ६१० शेतकºयांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. तर २ हजार ४११ शेतकºयांचे तूरीचे अनुदानन रखडले आहे.आतापर्यंत आलेले तूर व हरभºयाचे अनुदाना शेतकºयांना वितरीत करण्यात आले आहे. तूरीचे उर्वरीत अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. त्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे. आल्यानंतर ते तातडीने वाटप होईल.- एम. एच. माने, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी