अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धा ठार
By Admin | Updated: August 28, 2014 00:50 IST2014-08-28T00:03:44+5:302014-08-28T00:50:09+5:30
बुलडाणा-मलकापूर राज्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धा ठार.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धा ठार
मोताळा : बुलडाणा-मलकापूर राज्य मार्गावरील राजुर नजीकच्या फॅक्टरी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ६0 वर्षीय वृद्धा जागीच ठार झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री घडली.
पोलिस सुत्रांनुसार अपघातात ठार झालेल्या वृद्धेची अद्याप ओळख पटली नसून, मृतक वृद्धेच्या हातामध्ये एक डबा मिळाला आहे. डब्यावर लिहिलेल्या अनिल गांधी या नावावरून मलकापूर येथे ओळख पटविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र वृत्त लिहेपर्यंंत अज्ञात वाहन व मृतक वृद्धे बाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व रात्री पोस्टमार्टमसाठी प्रेत बुलडाणा येथे रवाना केले.