पाण्याच्या टाक्यात पडल्याने वृद्धाचा मृृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST2021-06-30T04:22:43+5:302021-06-30T04:22:43+5:30
आदर्श ग्राम याेजनेत सवडदचा समावेश सिंदखेड राजा : तालुक्यातील सवडद येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, पुणे यांच्या ...

पाण्याच्या टाक्यात पडल्याने वृद्धाचा मृृत्यू
आदर्श ग्राम याेजनेत सवडदचा समावेश
सिंदखेड राजा : तालुक्यातील सवडद येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, पुणे यांच्या तांत्रिक चमूने गावात भेट देऊन गाव फेरी व शिवार फेरी करून आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना राबवण्यासाठी गावाची निवड केल्याची घोषणा केली. यावेळी पोपटराव पवार यांनी ग्रामस्थांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.
सुंदर गाव स्पर्धेचे आयाेजन
बुलडाणा : शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० मार्च २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना जाहीर केलेली आहे. या योजनेकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आलेला आहे.
नगरपंचायतचे कामकाज खाेळंबले
माेताळा : येथील नगरपंचायतमध्ये अनेक पदे रिक्त आहेत़ त्यामुळे नगरपंचायतचे कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावर सुरू आहे़ काही कंत्राटी कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया ही नियंत्रणात !
बुलडाणा : पावसाळ्यात दरवर्षी साथीचे आजार डोके वर काढतात. सध्या कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. काेराेनाची लाट ओसरली असली, तरी पावसाळ्यातील आजार बळावण्याची शक्यता आहे़ त्यामुळे, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे़ यावर्षी मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुन गुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही़
पारडा दराडे परिसरात वन्यप्राण्यांचा हैदाेस
देऊळगाव कुंडपाळ : येथून जवळच असलेल्या पारडा दराडे परिसरात गत काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा हैदाेस सुरू आहे़. राेहिच्या कळपाने एका शेतकऱ्याच्या शेतातील भाजीपाला पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.
पीक कर्जासाठी अडवणूक केल्यास आंदोलन
साखरखेर्डा : पीक कर्ज वाटप करताना शेेतकऱ्यांची अडवणूक आढळून आल्यास त्याविरुद्ध आंंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप युुुवा मोर्चाच्या वतीने येेथील भारतीय स्टेट बँक शाखेकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
वृक्ष लागवड कामाच्या चौकशीची मागणी
किनगाव जट्टू : लोणार तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत वृक्ष लागवड झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड व लोणार तालुका अध्यक्ष अनिल मोरे यांनी केली आहे़
सिमेंटचे दर वाढले, सर्वसामान्यांना फटका
देऊळगाव मही : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.
ताडपत्रीसह शेती साहित्य खरेदीवर भर
धामणगाव धाडः पावसाळा सुरू झाल्याने घराची डागडुजी म्हणून टिनपत्रे, प्लास्टिक कापड ताडपत्री आदींच्या खरेदीवर ग्रामीण भागात जोर दिला जात आहे. ताडपत्रीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे़
संत रविदास नगरात सोयीसुविधा द्या !
चिखली : शहरातील संत रविदास नगरातील शेत सर्व्हे ९८ मधील आरक्षण क्र. ७२ व १७ या जागेवरील आरक्षण वगळून या नगरातील रहिवाशांना घरकूल, रस्ते, नाले आदी सोयीसुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी छोटू कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे आ. श्वेता महाले यांच्याकडे केली आहे.
हमीभावात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
बुलडाणा : खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तूर आणि उडदाला ३०० रुपये प्रतिक्विंटल व तिळाला ४५२ रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे.