तेलाची फोडणी महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:45+5:302021-03-23T04:36:45+5:30

पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने जनसामान्यांकडून ओरड होत असतानाच मागील आठवडाभरापासून खाद्य तेलाच्या किमती वाढत आहेत. कोरोनामुळे अनेकांची नोकरी ...

Oil spills are expensive | तेलाची फोडणी महागली

तेलाची फोडणी महागली

पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने जनसामान्यांकडून ओरड होत असतानाच मागील आठवडाभरापासून खाद्य तेलाच्या किमती वाढत आहेत. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. अनेकांचा व्यवसाय डबघाईस आल्याने ओढाताण करून जीवन कंठीत आहेत. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ केल्याने महिलांना स्वयंपाकाची घडी बसविण्यासाठी मोठी अडचण जात आहे. आठवडाभरापूर्वी सोयाबीन तेल किरकोळ बाजारपेठेत १२० रुपये होते. मात्र, आता त्यामध्ये १५ रुपयांची वाढ झाल्याने १३५ रुपयांवर पोहोचले आहे. पामतेल १२५ रुपये प्रतिलीटर, आरबी १२५ रुपये, फल्ली तेल १६०, सूर्यफूल १६५ रुपये प्रतिकिलो विक्री केले जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

साखर स्थिर, तर डाळीमध्ये चार ते पाच रुपयांची वाढ

गत महिनाभरापासून साखरेचे दर ३६ रुपये किलो स्थिर आहेत. तर डाळीच्या दरामध्ये चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत तूरडाळ शंभर ते ११० रुपये किलो, चणाडाळ ७० ते ८० रुपये, मसूर ७० ते ८०, मूंगमोगर १०० ते ११०, मूगडाळ १०० ते ११० रुपये प्रतिकलोने विक्री होत आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणातील वरण बनवणे कठीण झाले आहे.

Web Title: Oil spills are expensive