शासकीय कार्यालयातील दस्ताएवजे असुरक्षीत

By Admin | Updated: January 7, 2017 18:47 IST2017-01-07T18:47:32+5:302017-01-07T18:47:32+5:30

प्रशासकीय दुर्लक्षामुळे बºयाच कार्यालयात नागरिकांची महत्वाची दस्ताऐवज असुरक्षीत असल्याचे आढळून आले

The official office files are unsafe | शासकीय कार्यालयातील दस्ताएवजे असुरक्षीत

शासकीय कार्यालयातील दस्ताएवजे असुरक्षीत

>
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ७- -  जिल्ह्याचे मुख्यालय असल्यामुळे जवळपास सर्व शासकीय कार्यालय शहरात आहे. त्यामुळे जिल्ह्याभरातील नागरिक विविध कामासाठी या कार्यालयात येतात. अनेकांची महत्वाची कागदपत्रे, फाईला या कार्यालयात असतात. मात्र प्रशासकीय दुर्लक्षामुळे बºयाच कार्यालयात नागरिकांची महत्वाची दस्ताऐवज असुरक्षीत असल्याचे आढळून आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद आदी महत्वाच्या कार्यालयात महत्वाच्या कागदपात्रांचे गठ्ठे आलमारीत मांडून ठेवले आहे. बरेच गठ्यांचे कापड फाटल्यामुळे त्यातील महत्वाची कागदपत्रे
इतरत्र विखूरलेली आढळून येतात. बºयाच ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे फाईल व कागदपत्रे खराब झालेली दिसतात. भूमि अभिलेख व महसूल विभागाचे जिल्ह्यात जवळपास दिड कोटी कागदपत्रे आहे. यापैकी डिजीटल इंडिया या योजनेतून १ कोटी २५ कागदपत्रे डिजीडल करण्यात आली आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग, कृषी विभाग, शिक्षण, आरोग्य, बँका सह २१ विभागाचे कागदपत्रे अद्यापही डिजीडलच्या प्रतिक्षेत खराब होता आहे. काही कागदपत्रे तर कचºयात टाकण्यात आली आहे. १०० वर्ष जूनी कागदपत्रे होणार सुरक्षीत जिल्ह्यातील भूमि अभिलेख व महसूल विभागातील नागरिकांची जळवपास १०० वर्ष जूनी कागदपत्रे जवळपास सर्व कार्यालयात ठेवण्यात आली आहे.ही कागदपत्रे सुरक्षीत ठेवण्यासाठी त्या कागदपत्रांचे डिजिटलाझेन करण्याचे काम सुरु आहे. यामुळे सर्व कागदपत्रे सुरक्षीत केली जात आहे. दस्तावेजाचे पडतात तुकडे
काही शासकीय कार्यालयातील दस्तावेज एवढा जिर्ण आहे की, पाने चाळल्यानंतर त्यांचे अक्षरा: तुकडे पटतात. काही गठ्यांना वाळवीने पोखरु टाकले आहे. दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय गतवर्षी शॉर्टसर्किटने आग लागून जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्वाचे कागदपत्रे नष्ट झाली होती.
 
जवळपास ९८ टक्के कागदपत्रे डिजीटल करुन सुरक्षीत करण्यात आली आहे. शिवाय इतर विभागाचीही कागदपत्रे भविष्यात डिजीटल करण्यात येईल. शिवाय जिर्ण कागद प्रक्रियेद्वारे सुरक्षीत  करण्यात आले आहे.
- दीपक बाजड, तहसिलदार, बुलडाणा
 

Web Title: The official office files are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.