प्रचार वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: October 6, 2014 00:01 IST2014-10-05T23:50:23+5:302014-10-06T00:01:34+5:30
४ ऑक्टोबर रोजी प्रचारादरम्यान वाकोडी येथील घटना; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

प्रचार वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी गुन्हा
मलकापूर (बुलडाणा) : निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना प्रचार वाहनांच्या काचा फोडल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी वाकोडी येथे घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अरविंद कोलते हे तालुक्यातील वाकोडी येथे प्रचारासाठी गेले होते. त्यांनी सोबत आणलेली वाहने गावात उभी केली असताना अज्ञात व्यक्तींनी एम.एच.२८ सी ४८३७, एम.एच.२८ सी ७८९९, एम.एच.३0 एल ९५११, एम.एच.२८ व्ही ८८१४, एम.एच.१२ बीजी ३७९९, एम.एच.३0 सी ३१७३, एम.एच.0९ एएक्स ४९१0 अशा ७ वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. याबाबत उपरोक्त आशयाची फिर्याद सुधीर पांडे यांनी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कालुसिंग राजपूत, अरविंद तायडे यांच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.