महाशिवरात्रीनिमित्त कावड यात्रेतून ‘जलजागृती’
By Admin | Updated: February 18, 2015 01:03 IST2015-02-18T01:03:02+5:302015-02-18T01:03:02+5:30
चिखली तालुक्यात शिवलिंगासह नदी खोलीकरणाच्या कामास जलाभिषेक.

महाशिवरात्रीनिमित्त कावड यात्रेतून ‘जलजागृती’
चिखली (बुलडाणा) : महाशिवरात्रीनिमित्त प्राचिन पंचमुखी महादेव मंदिरापासून सुतगिरणीस्थित महाकांलेश्वर शिवमंदीरापर्यंत १७ फेब्रुवारी रोजी कावड यात्रा काढण्यात आली.
यावर्षी प्रथमच अध्यात्माच्या माध्यमातून जल साक्षरता निर्माण करणे हे या यात्रेचे वैशिष्ट ठरले असून कावड यात्रेव्दारे आणलेले पवित्र जल, महाकांलेश्वर मंदिरातील शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर तेच जल परिसरात सुरू असलेल्या नदी खोलीकरण व विस्तारीकरणाच्या पात्रात आमदार राहुल बोंद्रे यांचे हस्ते समर्पीत करण्यात आले.
यावर्षी प्रथमच पाण्याचा थेंब न थेंब शिवारात जिरविणे आणि नद्या नाल्याचे खोलीकरण व रंदीकरून करून भूगर्भातील जलपातळी वाढविण्याबरोबरच पाण्याचे दूर्भीक्ष्य दूर करणार्या महत्वाकांक्षी उपक्रमाची महती सुर्वदूर पोहचावी व जनतेत जलजागृती व्हावी यासाठी या कावड यात्रेव्दारे आणण्यात येणारे पवित्र जल या नदी खोलीकरणाच्या कामात सोडण्याचा व अध्यात्मिक मार्गाने जलजागृती करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. आ.राहुल बोंद्रे यांच्या पुढाकाराने अनुराधा परिवाराकडून दरवर्षी महाशिवरात्री निमित्त पंचमुखी महादेव ते सुतगिरणी परिसरातील महाकांलेश्वर मंदिर या सुमारे ४ मि.मी.अंतराची कावड यात्रा काढत येते.