महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा मद्यविक्रेत्यांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 23:48 IST2017-04-21T23:48:50+5:302017-04-21T23:48:50+5:30

१ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.

On the occasion of Maharashtra Day, on the Radar of the Gram Sabha, the Wine Rioters | महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा मद्यविक्रेत्यांच्या रडारवर

महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा मद्यविक्रेत्यांच्या रडारवर

सुधीर चेके पाटील
चिखली(बुलडाणा): बुलडाणा जिल्हय़ात दूध संकलन व वितरण केंद्रापेक्षा जास्त देशी, विदेशी दारू विक्रीची दुकाने, बार, वाईन शॉपची दुकाने होती. या दुकानांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने चाप बसल्याने आता केवळ बोटावर मोजण्याइतकीच दारूची दुकाने शिल्लक राहीली आहेत. सद्यस्थिती हे चित्र असले तरी महामार्गांवरून हद्दपार झालेली ही दुकाने महार्गांपासून ५00 मीटर अंतरावर पुन्हा थाटली जाणार आहेत. व पुन्हा दारूचा महापूर वाहून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होण्यास कारणीभूत ठरणार आहेत. ही वस्तुस्थिती पाहता किमान बंद झालेली ही दुकाने पुन्हा सुरू होणार नाहीत व नव्याने कोणाला परवाना मिळणार नाही यासाठी आता सुजान नागरीकांनी विशेषत: महिलांनी जागरूक राहणे गरजेचे असून येत्या १ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सध्या विशेषत: शहरा जवळील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५00 मिटर अंतरातील सर्व देशी दारूची दुकाने, बार, वाईन शॉपी, बियर शॉपी बंद आहेत. त्यामुळे तळीरामांच्या संख्येत काही अंशी घट होत आहे. सध्या बुलडाणा जिल्हय़ातील घाटावरील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा, चिखली, देऊळगावराजा व बुलडाणा या सहा तालुक्यात सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे सुमारे ८0 टक्के मद्यविक्रीची दुकाने बंद झाली असून घाटावरील सहा तालुक्यात सद्यस्थितीत २0 देशी दारूची दुकाने, ९ बीयर शॉप, ८ वाईन बार आणि २ वाईन शॉप असे एकूण ३९ मद्यविक्रीची दुकाने शिल्लक राहीली आहेत. यामध्ये चिखली तालुक्यात मद्यविक्रीची एकूण ८९ परवानाधारक दुकाने होती. यात २ होलसेलर, ५७ वाईन बार, १६ देशी दारू व १४ बियर शॉपींचा समावेश होता. या एकूण ८९ पैकी तब्बल ७२ परवानाधारक दुकाने आजरोजी बंद आहेत.
ग्रामपंचायतींचे ना हरकत प्रमाणपत्न असल्याशिवाय दारूचे दुकान सुरू करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी १ मे रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये दारूबंदीचे ठराव करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने शांतताप्रिय नागरिकांनी, महिलांनी आता सक्रीय होण्याची फारच गरज आहे, आपला दारू व अंमली पदार्थांना विरोध आहे हे स्पष्ट सांगण्याची गरज आहे. महामार्गाचे स्थानीय स्वराज्य संस्थांना होत असलेले हस्तांतरण थांबवले पाहिजे. गाव व शहरांत सध्या सुरु असलेली दारू दुकाने बंद करा किंवा शहराबाहेर त्यांना वेगळी जागा द्या ज्यायोगे कायदा व सुरक्षेचा धोका उद्भवणार नाही, यासाठी सामाजिक हीत जोपसणार्‍या पक्ष, संघटना, संस्थां, महिला मंडळे, बचत गट या सर्वांनी एकत्रीतपणे समोर येऊन प्रखर विरोध करणे गजरेचे आहे.

Web Title: On the occasion of Maharashtra Day, on the Radar of the Gram Sabha, the Wine Rioters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.