शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

चैनसुख संचेती यांच्या उमदेवारी अर्जावरील आक्षेप खारीज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 15:53 IST

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भीडे यांचे सर्व आक्षेप फेटाळून लावत, चैनसुख संचेती यांचा अर्ज वैध ठरविला.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार चैनसुख संचेती यांच्या विरोधात दाखल आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी शनिवारी फेटाळून लावला. त्यामुळे आगामी निवडणुकीत चैनसुख संचेती यांचे आव्हान कायम असल्याचे दिसून येते.संचेती यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना माहिती लपवली असा आक्षेप अपक्ष उमेदवार अभय सिताराम भिडे (रा. नांदुरा) यांनी नोंदविला. त्यात संचेती यांनी विदर्भ विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा न देता उमेदवारी अर्ज दाखल केला. कै. मदनलाल किसनलाल संचेती अशासकीय संस्था मलकापूर या संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणी तसेच आचारसंहिता भंग प्रकरणात त्यांना एक हजार रुपये दंड मलकापूर न्यायालयाने ठोठावल्याची माहिती लपविल्याचे नमूद केले होते. सुनावणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भीडे यांचे सर्व आक्षेप फेटाळून लावत, चैनसुख संचेती यांचा अर्ज वैध ठरविला.याचिकाकर्ते अजय भिडे यांच्यावतीने अ‍ॅड. गव्हांदे यांनी बाजू मांडली. चैनसुख संचेती यांच्यावतीने अ‍ॅड. हरिश शहा यांनी युक्तीवाद केला. या आक्षेपामुळे मलकापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

पुरावे दाखल न केल्याने फेटाळले आक्षेप!अशासकीय संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणी हरकतदारांनी भ्रष्टाचाराबाबत कागदपत्र दाखल केली नाहीत. त्यामुळे हरकत फेटाळण्यात आली. त्याचप्रमाणे आचारसंहिता भंग प्रकरणातही शिक्षा झाल्याचा पुरावा जोडला नसल्याने हरकत फेटाळण्यात आली. तर हरकतदाराने विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असल्याचे नमूद केले. मात्र, या नावाचे कोणतेही महामंडळ अस्तित्वात नसल्याचा संचेती यांच्याकडून युक्तीवाद करण्यात आला. तर प्रतिज्ञापत्रात माहिती लपवून ठेवण्यात आलेली माहिती किंवा चुकीची माहिती दिल्यास नामनिर्देशनपत्र फेटाळता येऊ शकत नाही. नामनिर्देशपत्रासोबत दाखल केल्या शपथपत्राची चौकशी करणे निम्न स्वाक्षरीकर्त्याचे अखत्यारित येत नाही. त्यामुळे ही हरकत फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :MalkapurमलकापूरChainsukh Sanchetiचैनसुख संचेतीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019