दहा उमेदवारांविरोधात आक्षेप

By Admin | Updated: September 2, 2015 02:19 IST2015-09-02T02:19:18+5:302015-09-02T02:19:18+5:30

पोलीस पाटील भरती प्रक्रियेत दहा उमेदवारांविरोधात आक्षेप; बुधवारी देणार आक्षेपावर निर्णय.

Objection against ten candidates | दहा उमेदवारांविरोधात आक्षेप

दहा उमेदवारांविरोधात आक्षेप

खामगाव : पोलीस पाटील पदासाठी दाखल झालेल्या ४४0 उमेदवारांपैकी १0 उमेदवारांविरोधात ३१ ऑगस्ट रोजी आक्षेप दाखल करण्यात आले आहे. आक्षेप आलेल्या उमेदवारांचा निर्णय बुधवारी देणार आहेत. खामगाव व शेगाव तालुक्यातील ७५ गावात पोलीस पाटील नियुक्त करावयाचे असून, ४४0 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते; पात्र, अपात्र उमेदवारांच्या नावाची यादी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर लावलेली असताना ३१ ऑगस्टच्या पात्र, अपात्र उमेदवारांच्या यादीवर आक्षेप घेण्याची तारीख होती. यामध्ये दहा उमेदवारांविरोधात आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खामगाव तालुक्यातील शर्मिला पंजाब कोळपे नांद्री (राजकारणात सहभाग), संतोष शिवरकर जळका तेली (शारीरिकदृष्ट्या अपंग), ऋषाली सुनील एकडे कुंबेफळ (ग्रा.पं.सदस्य), ज्ञानेश्‍वर आत्माराम बदरखे देऊळखेड (स्थानिक रहिवाशी नाही), सुनिता शंकर गव्हाळे कंझारा (तिसरे अपत्य), शारदा संतोष राठोड पिंप्री धनगर (मुक्त विद्यापीठातून पास), या उमेदवाराविरूद्ध विविध कारणाने आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी आक्षेपावर निर्णय घेऊन पात्र, अपात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून मिळाली आहे.

Web Title: Objection against ten candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.