पोषण आहार प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:20+5:302021-09-23T04:39:20+5:30
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंढेरा गावाच्या सरपंच रूपाली आंबिलकर व सिंधूबाई तेजनकर, कुशीवर्ता रामेश्वर जायभाये, विद्या हरिभाऊ जोशी यांची ...

पोषण आहार प्रदर्शन
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंढेरा गावाच्या सरपंच रूपाली आंबिलकर व सिंधूबाई तेजनकर, कुशीवर्ता रामेश्वर जायभाये, विद्या हरिभाऊ जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अंढेरा बीटमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषण आहाराचे व रांगोळीचे प्रदर्शन भरविले होते. यावेळी गरोदर माता व स्तनदा मातांची उपस्थिती होती. मनकर्णा तेजनकर, नंदा तेजनकर, संगीता म्हस्के, नीता तेजनकर, कविता तेजनकर, शारदा वाघ या मदतनीस हजर होत्या. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
पोषण आहाराबाबत जनजागृती
अंढेरा येथील अंगणवाडीमधील कार्यक्रमातून पोषण आहाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी त्यांना पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले. यावेळी रेखा तेजनकर, नंदा देशमुख, लीला डोईफोडे, रेणुका डोईफोडे, वंदना तेजनकर, सुनीता देशमुख, सविता राठोड, सरस्वती सानप या अंगणवाडी सेविका हजर होत्या.