रुग्णसंख्या वाढली

By Admin | Updated: October 27, 2014 22:49 IST2014-10-27T22:49:55+5:302014-10-27T22:49:55+5:30

हवामानाचा परिणाम, ताप, सर्दी, खोकल्यासह घशाच्या आजाराची लागण.

The number of patients increased | रुग्णसंख्या वाढली

रुग्णसंख्या वाढली

बुलडाणा : थंडीची चाहूल लागताच विषाणूजन्य आजारासह घसा दुखीचा त्नास वाढत असल्याचे नागरिकांमध्ये दिसत आहे. हवामानातील या बदलाने रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. शहरातील रुग्णालयामध्ये अशा रुग्णांची गर्दी दिसत आहे.
सर्वत्न ताप, खोकला, सर्दी व इतर आजारांची साथ सुरू आहे. काही ठिकाणी दिवसभर कडक ऊन्ह आणि रात्नी थंडी पडत आहे. त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलाचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. असे वातावरण विषाणूच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे सध्या विषाणूजन्य आजार, घशाचे संसर्ग वाढले आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरण राह त असल्याने सकाळी थंडी, काही ठिकाणी दुपारी कडक ऊन्ह पडल्याने तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवतो, तर सायंकाळी आणि पुन्हा रात्नी गारव्यात वाढ होते. किमान ता पमानात घट होत आहे. थंडी उत्तरोत्तर वाढत जाणार असून, हवामानाच्या बदलाचा परिणाम दिसत आहे. बुलडाणा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.
वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. यापासून त्रास होऊ नये म्हणून थंड पदार्थ खाणे टाळावे, गरम पाण्याची वाफ घ्यावी; परंतु जास्त त्रास वाढल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत असे डॉ.पी.पी. पिप्रींकर यांनी सांगीतले.

Web Title: The number of patients increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.