रुग्णसंख्या घटली, वाढत्या मृत्यूने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 11:16 AM2021-07-27T11:16:25+5:302021-07-27T11:16:31+5:30

Corona Cases in Buldhana : २४ जुलै राेजी दाेन आणि २५ जुलै राेजी एका रुग्णाचा काेराेनाने मृत्यू झाला आहे.  

As the number of patients decreased, increasing deaths increased anxiety | रुग्णसंख्या घटली, वाढत्या मृत्यूने चिंता वाढली

रुग्णसंख्या घटली, वाढत्या मृत्यूने चिंता वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा  : जिल्ह्यात दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच, वाढत्या मृत्यूने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 
दाेन दिवसांत तिघांचा काेराेनाने मृत्यू झाला हाेता़, तसेच साेमवारी आणखी तिघांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला असून, एकही मृत्यू झाला नाही, चार रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. २४ जुलै राेजी दाेन आणि २५ जुलै राेजी एका रुग्णाचा काेराेनाने मृत्यू झाला आहे.  
  पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शेगाव तालुका   कालखेड १, सि.राजा तालुका  मलकापूर पांग्रा १, चिखली तालुका गोद्री येथील एका रुग्णाचा समावेश आहे, तसेच आजपर्यंत ६ लाख २९ हजार ८६४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.  
  आज रोजी १,३११ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार २४०  कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८६ हजार ५५२  कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे १६ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच आजपर्यंत ६७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
 

Web Title: As the number of patients decreased, increasing deaths increased anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app