आता रेशनवर मिळणार मका, ज्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:43+5:302021-02-13T04:33:43+5:30

एक किलोला एक रुपया मका आणि ज्वारीसाठी लाभार्थ्यांना एक किलोला एक रुपया द्यावा लागणार आहे. यापूर्वी दोन रुपये किलोने ...

Now we will get maize and sorghum on ration | आता रेशनवर मिळणार मका, ज्वारी

आता रेशनवर मिळणार मका, ज्वारी

एक किलोला एक रुपया

मका आणि ज्वारीसाठी लाभार्थ्यांना एक किलोला एक रुपया द्यावा लागणार आहे. यापूर्वी दोन रुपये किलोने गहू व तीन रुपये किलोने तांदूळ दिला जात होता. आता एक रुपये किलोने मका आणि ज्वारीही दिली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आता रेशनवर मका आणि ज्वारी मिळणार आहे, परंतु हा लाभ अंत्योदय आणि प्रधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांनाच राहणार आहे. त्याची अंमलबजावणी या महिन्यापासून होत आहे.

गणेश बेल्लाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा

रेशनवर मका आणि ज्वारी देण्याचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे गोरगरिबांना चांगला लाभ होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तसेच निराधारांना चांगली मदत होईल.

विष्णू रवंदळे, लाभार्थी

मका आणि ज्वारी देणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंद आहे, परंतु हा लाभ एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनाही देणे आवश्यक होते, तसेच गहू वितरणाचे प्रमाण यामध्ये कमी करायला नको होते.

नितेश धर्मे, लाभार्थी

जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका - ५,५४,४०६

प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका - ३,३७,९५२

अंत्योदय शिधापत्रिका - ६४,८१९

एपीएल शेतकरी शिधापत्रिका - ४,८७,९६७

Web Title: Now we will get maize and sorghum on ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.