आता तरी कोरोनापासून स्वतःचे व आपल्या परिवाराचा बचाव करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:08+5:302021-04-01T04:35:08+5:30
डोणगाव - राज्यासह बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तर महागाईच्या भडक्याने जनता त्रस्त असून दुसरीकडे अस्मानी संकटाने शेतकऱ्यास ...

आता तरी कोरोनापासून स्वतःचे व आपल्या परिवाराचा बचाव करा
डोणगाव - राज्यासह बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तर महागाईच्या भडक्याने जनता त्रस्त असून दुसरीकडे अस्मानी संकटाने शेतकऱ्यास जेरीस आणले. यावर लक्ष वेधण्यासाठी माजी राज्यमंत्री यांनी ३१ मार्च रोजी कोरोनाविषयक नियम पाळून एक रॅली काढली. या रॅलीत कोणतीही नारेबाजी न करता फक्त हातात फलक घेऊन आपले मत मांडण्यात आले.
राज्यभरात वाढता कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. अशातच सर्वांना कोरोना सोबत जगायचे आहे. शारीरिक अंतर, तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर, लसीकरण या गोष्टी पाळल्यानंतरच कोरोनापासून बचाव होईल. तेव्हा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कोरोनासंबंधी जनजागृती आपल्या कृतीतून जनमानसान्यापर्यंत पोचवली. त्यांनी काढलेल्या रॅलीदरम्यान कोरोना विषयी जनजागृती फलक, कोरोना काळात मदत करणारे डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी कर्मचारी यांच्या आभारासाठी फलक हातात घेण्यात आले होते. यात महागाई कमी करा पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांचे भाव कमी करा, गारपीट व अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना त्वरित मदत द्या या फलकांचा समावेश होता. या रॅलीत कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शेकडो कार्यकर्यांनी सहभाग नोंदविला. या रॅलीमध्ये शैलेश सावजी, चरण आखाडे, श्याम इंगळे, सत्तार शाह, मुरलीधर लाभाडे, भूषण आखाडे, यासिन कुरेशी, संदीप पांडव, लक्ष्मणराव पादरे, भाऊराव जावळे, गजानन इरेगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.