आता एसएमएसद्वारे करता येणार पालिकेकडे तक्रार
By Admin | Updated: May 3, 2017 00:21 IST2017-05-03T00:21:56+5:302017-05-03T00:21:56+5:30
जळगाव जामोद : जळगाव जामोद नगर परिषदेने महाराष्ट्र दिनापासून एसएमएसद्वारे तक्रार करण्याची व तक्रार निवारण करण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे.

आता एसएमएसद्वारे करता येणार पालिकेकडे तक्रार
कॅशलेसच्या दिशेने वाटचाल : पीओएस मशीन केली कार्यान्वित
जळगाव जामोद : जळगाव जामोद नगर परिषदेने महाराष्ट्र दिनापासून एसएमएसद्वारे तक्रार करण्याची व तक्रार निवारण करण्याची प्रणाली कार्यान्वित केली आहे. तसेच कॅशलेस व्यवहारासाठी नगर परिषदेने १ मे पासून पी.ओ.एस. मशीनसुद्धा नगर परिषदेमध्ये कार्यान्वित केली आहे. याचे उद्घाटन महाराष्ट्रदिनी भाजपाचे प्रदेश महामंत्री आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सीमाताई डोबे, न.प. उपाध्यक्ष मांगीलाल भंसाली, शहराध्यक्ष प्रकाश बगाडे, नगर परिषदचे बांधकाम सभापती नलुताई भाकरे, नियोजन सभापती अनिता कपले, आरोग्य सभापती सविता खवले, महिला व बालकल्याण सभापती जयमाला इंगळे, शिक्षण सभापती उषाताई धंदर, नगरसेविका पार्वताबाई कोथळकार व रत्नप्रभा खिरोडकर, नगरसेवक शैलेंद्र बोराडेव, नीलेश शर्मा, मुख्याधिकारी प्रशांत शेळके, नगरसेविका चित्राताई इंगळे यांची उपस्थिती होती, तसेच यावेळी जळगाव जामोद शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या महिला बचत गटातील भगिनींचा व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. पीओएस मशीनच्या मदतीने नागरिकांना एटीएमद्वारे आपल्या कराचा भरणा करता येईल. त्यामुळे नगर परिषद आता कॅशलेसकडे वाटचाल सुरू झाली आहे; तसेच जळगाव जामोद शहर स्मार्ट करण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांचा लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना आ.डॉ.संजय कुटे यांनी दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी नगराध्यक्ष सीमाताई डोबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक लोकेश शर्मा, युवा मोर्चा अध्यक्ष अजय वंडाळे, कैलास डोबे, शरद खवणे, रमेश कोथळकार, अरूण खिरोडकार, अनिल कपले यांची उपस्थिती होती.