महाविद्यालयांमध्ये आता ‘युवा अंनिस’
By Admin | Updated: August 10, 2014 18:20 IST2014-08-10T18:20:18+5:302014-08-10T18:20:18+5:30
अखिल भारतीय अंधo्रद्धा निर्मुलन समितीने आता महाविद्यालयांमध्ये शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयांमध्ये आता ‘युवा अंनिस’
बुलडाणा: अखिल भारतीय अंधङ्म्रद्धा निर्मुलन समितीने आता महाविद्यालयांमध्ये शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक महाविद्यालयात ह्ययुवा अंनिसह्ण या नावाने या शाखांचे गठन होणार असून, त्याचा प्रांरभ बुलडाणा जिल्ह्यापासून करण्यात येणार आहे. अंधङ्म्रद्धा निर्मुलन समितीच्या लोणावळा येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत, ह्ययुवा अंनिसह्णची संकल्पना स्पष्ट करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर २७ व २८ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत, संस्थापक संघटक श्याम मानव यांनी, ह्ययुवा अंनिसह्णच्या माध्यमातून युवाशक्तीला अंधङ्म्रद्धा निमुर्लनच्या कार्यात मोठया संख्येने सहभागी करून घेण्याची आवश्यकता प्रतिपादित केली होती. त्या अनुषगांने अंनिसचे बुलडाणा जिल्हा सचिव प्रमोद टाले यांनी महाविद्यालयांमध्ये ह्ययुवा अंनिसह्ण शाखांचे गठन करण्याबाबत पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील मलकापूर येथील धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, तसेच वरवट बकाल येथील कला व वाणीज्य महाविद्यालयासोबत यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून, जिल्हाभरातील इतर महाविद्यालयाशीही संपर्क साधला जात आहे. या महिनाअखेरपर्यंत महाविद्यालयीन शाखा कार्यान्वीत होतील, असे ते म्हणाले.