‘चारीमेरा’ कादंबरीचा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:52+5:302021-02-05T08:34:52+5:30

चारीमेरा या कादंबरीला २०१६ चा राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेतील प्रौढ कादंबरी विभागातील हरी नारायण आपटे ...

The novel 'Charimera' is included in the syllabus of Nagpur University | ‘चारीमेरा’ कादंबरीचा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

‘चारीमेरा’ कादंबरीचा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

चारीमेरा या कादंबरीला २०१६ चा राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेतील प्रौढ कादंबरी विभागातील हरी नारायण आपटे राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर येथील जिव्हाळा साहित्य पुरस्कार, नाशिक येथील कादवा प्रतिष्ठाणचा कादवा शिवार पुरस्कार, मराठी साहित्य प्रतिष्ठान, जामखेडचा संत तुकाराम साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यासोबतच या कादंबरीचे सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून क्रमश: अभिवाचन झालेले आहे.

दरम्याऩ डॉ. सदानंद देशमुख यांच्या ‘तहान’ आणि ‘बारोमास’ या कादंबऱ्यांचासुद्धा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. त्यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीला २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला असून या कादंबरीवर आधारित हिंदी चित्रपट आणि मराठी नाटकसुद्धा आले आहे. हिंदी, इंग्रजी, उर्दू, मैथिली या भाषांतही तिचा अनुवाद झालेला आहे. कोकणी भाषेतसुद्धा अनुवाद होत आहे.

आजच्या कृषी व्यवस्थेचे प्रभावी चित्रण

चारीमेरा या कादंबरीतून आजच्या कृषी व्यवस्थेचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. चारीमेरा म्हणजे शेताच्या चारही बाजू. शेतीच्या सीमानिश्चितीशी संबंधित हा वैदर्भीय शब्द आहे. वेळेच्या वेळी बांधबंदिस्ती करून चारीमेरा मजबूत ठेवाव्या लागतात. त्यासंदर्भाने दोन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ही कांदबरी फुलत जाते.

Web Title: The novel 'Charimera' is included in the syllabus of Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.