अमडापूर उपसरपंचावर अविश्वास ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:10 IST2017-08-17T00:10:55+5:302017-08-17T00:10:55+5:30
अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं. १७ सदस्यांची असून, या सदस्यांना प्रत्येक वार्डातील लोक गावाच्या विकासासाठी निवडून देत असतात; परंतु या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असलेले अर्जुन नेमाडे यांच्या १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या काही विषयांवर ठपका ठेवून १६ सदस्यांनी तहसीलदार चिखली यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.

अमडापूर उपसरपंचावर अविश्वास ठराव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं. १७ सदस्यांची असून, या सदस्यांना प्रत्येक वार्डातील लोक गावाच्या विकासासाठी निवडून देत असतात; परंतु या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असलेले अर्जुन नेमाडे यांच्या १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या काही विषयांवर ठपका ठेवून १६ सदस्यांनी तहसीलदार चिखली यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.
दाखल केलेल्या अविश्वास ठरावामध्ये उपसरपंच अर्जुन नेमाडे हे ग्रा.पं.सदस्याचा मान न राखणे, ग्रा.पं.सदस्यांना एकेरी व आरेतुरेच्या भाषेमध्ये बोलणे, ग्रा.पं.च्या मासिक सभेमध्ये बोलणे, ग्रा.पं.सदस्यांना विश्वासात न घेता स्वत: निर्णय घेणे व नागरिकांची दिशाभूल करणे असा ठपका ठेवून ग्रा.पं.चे सदस्य राम शिवराम देशमुख, सरपंच ललिता विष्णू माळोदे, गजानन नारायण वानखडे, गजानन सोनाजी चोपडे, छाया अमोल पाखरे, अंजना अंबादास जुमडे, श्रीमती कमलबाई तुकाराम वानखडे, हमिदाबी शे.ताज, ललिता दिलीप खंदलकर, म.शमीम म.शमशुमर, रेखा भारत खाजभागे, आसमापरविन म.जुबेरआलम, कमरअफजल खान मóोखान, पुंजाजी दगडु गायकवाड, रवींद्र प्रल्हाद काळे, सुनंदा धोंडु देवकर या १६ सदस्यांनी तहसीलदार चिखली यांच्याकडे सह्यानिशी उपसरपंच अर्जुन शंकर नेमाडे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे.
आता येणार्या काही दिवसांमध्ये उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे गावकर्यांचे लक्ष लागले आहे.