नाेंदणी केल्यानंतरही लस मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:36 IST2021-05-08T04:36:57+5:302021-05-08T04:36:57+5:30

पिंपळगाव सराई : ऑनलाइन नाेंदणी केल्यानंतरही लस मिळत नसल्याचे चित्र रायपूर प्राथमिक आराेग्य केंद्रात आहे. त्यामुळे, ७ मे ...

No vaccine was available even after registration | नाेंदणी केल्यानंतरही लस मिळेना

नाेंदणी केल्यानंतरही लस मिळेना

पिंपळगाव सराई : ऑनलाइन नाेंदणी केल्यानंतरही लस मिळत नसल्याचे चित्र रायपूर प्राथमिक आराेग्य केंद्रात आहे. त्यामुळे, ७ मे राेजी लस घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना परत जावे लागले.

रायपूर प्राथमिक आराेग्य केंद्रात ७ मे राेजी ४७ वॅक्सिन उपलब्ध असल्याचे ऑनलाइन दिसत हाेते़ त्यामुळे, परिसरातील १८ ते ४४ वयाेगटातील ग्रामस्थांनी ऑनलाइन नाेंदणी केली तसेच लस घेण्यासाठी रायपूर प्राथमिक आराेग्य केंद्र गाठले. तिथे गेल्यानंतर मात्र लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे किन्हाेळा, धाड परिसरातील नागरिकांना लस न घेताच परत जावे लागले. ऑनलाइन साठा असतानाही लस न मिळाल्याने अनेकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, त्यांनीही लसीचा साठा संपल्याचे सांगितले. त्यामुळे, लस घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना परत जावे लागले. प्राथमिक आराेग्य केंद्रात मुबलक लससाठा उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: No vaccine was available even after registration