ऑक्सिजन मिळेना, रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:22+5:302021-04-23T04:37:22+5:30
राज्यात सध्या ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. जालना येथील एस्सेम गॅसेस प्रा.लि. या कंपनीत ऑक्सिजनची निर्मिती होते. सध्या ...

ऑक्सिजन मिळेना, रुग्णांची हेळसांड
राज्यात सध्या ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. जालना येथील एस्सेम गॅसेस प्रा.लि. या कंपनीत ऑक्सिजनची निर्मिती होते. सध्या जालन्यातील स्टील कंपन्यांना पुरविला जाणारा इंडस्ट्रियल गॅस पुरवठा बंद करण्यात आला असून केवळ रुग्णांना वाचविण्यासाठी ऑक्सिजनचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. सिंदखेडराजा येथील जिजाऊ हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटलला सध्या ऑक्सिजनची गरज असताना जालन्यातील प्लांटमधून ऑक्सिजन नाकारण्यात आल्याने मोठी अडचण झाली आहे. या हॉस्पिटलमध्ये सध्या २३ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी जवळपास १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. आतापर्यंत या रुग्णालयाला जालन्यातून याच कंपनीकडून ऑक्सिजन मिळत होता. मात्र, गुरुवारी अचानक जालना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे सांगून कंपनीने ऑक्सिजन नाकारल्याने रुग्णांवर उपचार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयाकडे सध्या असलेला ऑक्सिजन साठा केवळ एक दिवस पुरेल इतकाच आहे.