आयटीआयमधील पाच शिक्षकांना संस्थेत ‘नो एन्ट्री’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:09 IST2017-08-02T02:09:09+5:302017-08-02T02:09:40+5:30

शेगाव :  शहरातील शासनाच्या आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये सोमवारी प्राचार्या आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद शिगेला पोहचला होता. मंगळवारी यात आणखी भर पडली.

'No Entry' in Five Institutes of ITI | आयटीआयमधील पाच शिक्षकांना संस्थेत ‘नो एन्ट्री’ !

आयटीआयमधील पाच शिक्षकांना संस्थेत ‘नो एन्ट्री’ !

ठळक मुद्देप्राचार्या, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील वाद पोहचला शिगेला संस्थेतील ५ निदेशक शिक्षकांना ‘चले जाव’चा इशारा पोलिसात तक्रार देईल अशी धमकी 

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव :  शहरातील शासनाच्या आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये सोमवारी प्राचार्या आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद शिगेला पोहचला होता. मंगळवारी यात आणखी भर पडली. प्राचार्या पाटील यांनी संस्थेतील ५ निदेशक शिक्षकांना ‘चले जाव’चा इशारा देत संस्थेत प्रवेश करू दिले नाही. तर संस्थेकडे फिरकूनही पाहिले तर पोलिसात तक्रार देईल अशी धमकी त्यांनी दिल्याचा आरोप शिक्षकांकडून होत आहे.
 शेगाव येथील आयटीआय या संस्थेत असलेला प्राचार्या राजश्री पाटील आणि शिक्षक, विद्यार्थ्यांमधील वाद सोमवारी उफाळून आला. शिक्षकांचा थकीत पगार विद्यार्थ्यांना कोपा अंतर्गत असलेल्या रोजगार कौशिल्य या विषयाला नसलेल्या शिक्षकांबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे शिष्टमंडळाला हिसकावून हाकलून देण्याच्या घटनेने वाद उफाळला होता. यावेळी प्राचार्यावर कारवाई व्हावी अन्यथा परीक्षेवर बहिष्कार घालू असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला असतांना मंगळवारी या वादात आणखी भर पडली. सकाळी निदेशक नेहमी प्रमाणे संस्थेतच्या प्रवेश द्वारावर पोहचले असता त्यांना सुरक्षा रक्षकांनी आता जाऊ दिल्या नाही. ब?्याच वेळापयर्ंत हा वाद सुरु असतांना प्राचार्या पाटील ह्या प्रवेशद्वारा वर पोहचून आज पासून तुम्हाला संस्थेतून काढले आहे. तुमच्याने जे होत असेल ते करून घ्या, व तुमचा पगार हि देत नाही. अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप प्रवेशद्वारा वर पोहचलेले एच.एस. गडम यांनी केला आहे.  
 

Web Title: 'No Entry' in Five Institutes of ITI