शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेट नको, मला मास्क, सॅनिटायझर हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 15:19 IST

Buldhana News नवीन मास्क, सॅनिटायझरची बॉटल हवी, असा हट्ट मुले धरू लागली आहेत.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शाळेत जाण्यासाठी मुले ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना चॉकलेट, नवीन शैक्षणिक साहित्य असे विविध प्रलोभने दाखवली जातात; मात्र आता मुलांची मागणी बदलल्याचे दिसून येत आहे. शाळेत जाण्यापूर्वी मुले चॉकलेट नको, मला नवीन मास्क, सॅनिटायझरची बॉटल हवी, असा हट्ट धरू लागली आहेत. मुलांच्या हट्टामुळे गेल्या आठवडाभरामध्ये मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. आता इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. आतापर्यंत ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेली मुले आता शाळेत जायला लागली आहेत.  शाळा सुरू होऊन अवघे दहा दिवस लोटले असून, या दहा दिवसात मेडिकलमधील मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. शाळा सुरू असताना मुले दररोज नवीन पेन, पेन्सिल, वही, कंपास यांसारख्या शैक्षणिक साहित्यासह चॉकलेट, बिस्किटची मागणी पालकांकडे करतात. मुलांकडून होणाऱ्या विविध वस्तूंच्या या हट्टामध्ये आता काहीसा बदल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मुले शाळेत जाण्यापूर्वी पालकांकडे आता नवीन मास्क, सॅनिटायझरची बॉटल मागत आहेत. मित्राने जसे रंगीत, डिझाईनचे मास्क आणले, मलाही तसेच मास्क हवे, यासाठी मुले हट्ट धरत असल्याचे काही पालकांनी सांगितले. मुलांच्या या हट्टामुळे मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाल्याची माहिती मेडिकलचालकांनी दिली. 

स्प्रेवाल्या सॅनिटायझरची मागणीमुलांकडून सध्या शाळेत नेण्यासाठी स्प्रेवाल्या सॅनिटायझरची मागणी होत आहे. सध्या मेडिकलमध्ये अगदी २५ रुपयांपासून सॅनिटायझरच्या बॉटल उपलब्ध आहेत. त्यामध्ये जेलीवाले सॅनिटायझर, स्प्रेवाले सॅनिटायझर आहेत; परंतु मुलांना स्प्रेवाले सॅनिटायझरच पाहिजेत. 

दर दोन दिवसाला लागते सॅनिटायझरशाळा सुरू झाल्यापासून गत आठवडाभरामध्ये मास्क आणि सॅनिटायझरची विक्री वाढली आहे. काही मुले दर दोन दिवसाला नवीन मास्क, सॅनिटायझर खरेदीसाठी येतात.            

- गजानन सवडतकर, मेडिकल चालक.

दप्तरात घेतली सॅनिटायझरने जागापूर्वी मुलाला शाळेत जाण्यापूर्वी चाॅकलेट किंवा नवीन पेन, पेन्सिल घेऊन द्यावी लागत होती. आता वेगवेगळ्या मास्क आणि सॅनिटायझरसाठी हट्ट पुरवावे लागत आहेत. - ज्ञानेश्वर पवार, पालक.

डिझाईनच्या मास्कची क्रेझशाळेत आपले मास्क सर्वात चांगले दिसावे, यासाठी मुलींमधून डिझाईनच्या मास्कची क्रेझ वाढली आहे. बाजारात वेगवेगळ्या रंगाचे व डिझाईनचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत; परंतु त्यामध्ये मुली डिझाईनच्या मास्कला पसंती देत आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाStudentविद्यार्थी