रामप्रसादजी लाहोटी यांचे नववे पुण्यस्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST2021-01-15T04:28:55+5:302021-01-15T04:28:55+5:30
७० वर्षांचा रुग्णसेवेचा अनुभव असलेले लाहोटी कुटुंब हा रुग्ण सेवेचा वारसा अविरतपणे सुरूच ठेवून आणि आपल्या वडिलांचे समाज सेवेचे ...

रामप्रसादजी लाहोटी यांचे नववे पुण्यस्मरण
७० वर्षांचा रुग्णसेवेचा अनुभव असलेले लाहोटी कुटुंब हा रुग्ण सेवेचा वारसा अविरतपणे सुरूच ठेवून आणि आपल्या वडिलांचे समाज सेवेचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकारले. स्व. डॉ. लाहोटी यांनी आपले वडील स्व. नारायण दासजी लाहोटी यांच्याकडून अर्धांगवायू रुग्णसेवेचा वसा घेतला. हाच वसा आणि हीच प्रेरणा घेऊन शिक्षणरत्न आणि दि प्राइड ऑफ इंडिया या पुरस्काराने सन्मानित डॉ. साहेबांचे धाकटे पुत्र संजय लाहोटी यांनी वडिलांचे स्वप्न साकार केले. साहेबांचे थोरले पुत्र डॉ. हेमराज लाहोटी यांनी त्यांचा रुग्णसेवेचा वसा सुरू ठेवत तो वसा पुढील पिढी डॉ . शशिराजजी लाहोटी आणि सोमेश लाहोटी यांना सुपुर्द केला. या पुण्यस्मरण दिनानिमित्त गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच ग्रुप ऑफ कॉलेजेसचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. (वा.प्र.)