शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांंना घडविणारे निंबाळकर गुरूजी

By admin | Updated: September 5, 2014 00:22 IST

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांंना घडविणारे निंबाळकर गुरूजी.

जयदेव वानखडे /जळगाव जामोदगावात जायला रस्ता नाही. स्वातंत्र्याची ६७ वर्षे उलटली तरी अद्याप ज्या गावात एसटी पोहचली नाही, जेथे मुलांची भाषा शिक्षकाला कळत नाही अन शिक्षक काय म्हणतात ते मुलांना समजत नाही, अशा विपरीत परिस्थितीत जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या उंच भागावर अतिशय दुर्गम भागातल्या भिंगारा गावात राहून गेल्या २00४ पासून अध्यापनाचे काम करणारे बालाजी सुभाष निंबाळकर गुरूजी या परिसरात लोकप्रिय ठरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातला तरूण शिक्षकाची नोकरी मिळते म्हणून जेथे कोणीही जाण्यास तयार नाही अशा दुर्गम भागात जातो आणि भिंगारा या आदिवासी लोकवस्तीच्या गावाला आपलं करतो. गावात कोणत्याच सुविधा नाहीत, वीज नाही, आपली भाषा कळणारी माणसं नाही जेथे केवळ पायी अथवा दुचाकीनेच जावे लागते अशा या गावात जावून तेथे राहून विद्यार्थी घडविण्याचे काम निंबाळकर गुरूजींनी भाषेची अडचण दूर व्हावी म्हणून गुरूजींनीच प्रथम आदिवासी भाषा अवगत केली अन् मग त्या विद्यार्थ्यांंना सुरू केले शिक्षणाचे धडे. अनंत परिश्रमानंतर आज ती शाळा आनंददायी शाळा झाली. २५२ पटसंख्या असलेल्या शाळेत गुरूजींनी लावलेली शिक्षणाची ओढ कामी आली. एकही विद्यार्थी घरी राहत नाही. दररोज शाळेत येतो, गणित, बुध्दीमत्ता, इंग्रजी, मराठी, हिंदी लिहिता वाचता आणि बोलायला शिकला. येथील विद्याथ्यराना शिकवण्यासाठी त्यांनी चित्ररूप माहिती, बोलक्या भिंती, अंक कार्डाचा वापर, गाणी, गोष्टी, खेळ, चर्चा, गटपध्दतीने निसर्गाच्या सान्निध्यात शिकविले. त्यांच्याशी ह्या नेहमीच्या संपर्कामुळे ती मुले जवळ आली, यासाठी गुरूजी तेथे वास्तव्यास असल्याने शाळेतच राहायचे त्यामुळे २४ तास शाळा विद्यार्थ्यांंंना खुली असायची. निंबाळकर गुरूजी सध्या या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. खेळातही येथील विद्यार्थी प्रवीण असून केंद्र, तालुका पातळीवर चमक दाखवितात.