शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

पालकांची हलगर्जी ; ४६६ विद्यार्थी 'आरटीई' प्रवेशापासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 2:42 PM

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काही पालकांनी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क न केल्यामुळे जिल्ह्यातील ४६६ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देसंपर्क न केल्यामुळे ४२३ विद्यार्थी आरटीईच्या प्रवेशासाठी अपात्र ठरले आहेत. तर ४३ विद्यार्थी हे कागदपत्राच्या त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत.जिल्हाभरातून एकूण १ हजार ६०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाहिल्याच लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काही पालकांनी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क न केल्यामुळे जिल्ह्यातील ४६६ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना आरटीईतील प्रवेशापासून वंचीत रहावे लागणार असून, पालकांची हलगर्जी (संपर्क न करणे) विद्यार्थ्यांच्या ‘शिक्षण हक्कावर’ बेतली असल्याचे दिसून येत आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहयाीत शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्ह्यातील २२० शाळांमध्ये २ हजार ९०८ जागांसाठी सुरू असलेल्या आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ५ हजार ३२८ आॅनलाइन अर्ज आले. त्यासाठी लॉटरीपद्धतीने पहिली फेरी पूर्ण करण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना वेळोवेळी मोबाईलवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाडून माहिती पोहचविण्यात आली; मात्र प्रवेशाच्या १० मे या अंतीम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील काही पालकांनी शाळा, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संपर्क न केल्यामुळे ४२३ विद्यार्थी आरटीईच्या प्रवेशासाठी अपात्र ठरले आहेत. तर ४३ विद्यार्थी हे कागदपत्राच्या त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ८१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ खामगाव तालुक्याचा समावेश आहे. अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीतही प्रवेश घेता येणार नसल्याने त्यांना या मोफत प्रवेशापासूनच वंचीत राहावे लागणार आहे.

४३ अर्ज कागदपत्राच्या त्रुटीतआरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ४३ अर्ज हे कागपत्राच्या त्रुटीत अडकल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने अपात्र ठरविले आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यात १३, देऊळगाव राजा ८, खामगाव चार, मलकापूर तीन, मोताळा दोन, नांदूरा नऊ, संग्रामपूर एक असे एकूण ४३ विद्यार्थी कागदपत्राच्या त्रुटीमुळे अपात्र ठरविण्यात आलेले आहेत.

सिंदखेड राजा तालुक्यात एकही अपात्र नाही आरटीईअंतर्गत प्रत्येक तालुक्यातून काही प्रमाणात विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत. ज्यामध्ये कागद पत्राच्या त्रुटी किंवा संपर्क न करणे अशा कारणांचा समावेश आहे. परंतू सिंदखेड राजा तालुक्यातून एकही विद्यार्थी अपात्र ठरलेला नाही, हे विशेष. सिंदखेड राजा तालुक्यात एकुण १६ शाळा असून १६५ रिक्त जागा आहेत. तर १५२ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. पाहिल्या लॉटरीमध्ये एकूण २९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून या तालुक्यातून एकही विद्यार्थी अपात्र नाही.

१६०९ प्रवेश पूर्ण४१० मे पर्यंत झालेल्या राबविण्यात आलेल्या आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जिल्हाभरातून एकूण १ हजार ६०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात २२२, चिखली ९७, देऊळगाव राजा ६६, जळगाव जामोद ११७, खामगाव २२६, लोणार १३५, मलकापूर १७९, मेहकर १८८, मोताळा ४८, नांदूरा ८७, संग्रामपूर ५८, शेगाव १५७, सिंदेखड राजा २९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा