शहरात रात्री ध्वनिक्षेपकावर बंदी
By Admin | Updated: July 24, 2015 00:45 IST2015-07-24T00:45:00+5:302015-07-24T00:45:00+5:30
पोलीस अधीक्षकांचे आदेश; रात्री १0 ते सकाळी ६ पर्यंंत अंमलबजावणी.

शहरात रात्री ध्वनिक्षेपकावर बंदी
बुलडाणा : ध्वनिप्रदूषण नियंत्रण व नियमन नियम कायदा २000 ची अंमलबजावणी करण्याबाबत उच्च न्यायालयाने १३ मार्चला दिलेल्या आदेशावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाची निक्युक्ती करण्यात आली आहे. या आदेशान्वये, शहरात रात्री १0 ते सकाळी ६ पयर्ंत सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक वाजविण्यावर बंदी घालण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी २२ जुलै रोजी कळविले.
शहरातील सार्वजनिक ठिकाणासह इतर ठिकाणी रात्री १0 वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यत या ध्वनिक्षे पकांवर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार शहर व परिसरातील अ क्षेत्राच्या प्रवर्गामध्ये औद्योगिक क्षेत्राचा समावेश होत असून, येथे ७५ डेसिबल्स एलक्यूमधील र्मयादा दिवसाकरिता ७५, तर रात्रीसाठी ७0, ब क्षेत्राच्या प्रवर्गामध्ये वाणिज्यिक क्षेत्राचा समावेश होत असून, डेसिबल्स एलक्यूमधील र्मयादा दिवसाकरिता ६५ व रात्री ५५ , क क्षेत्राच्या प्रवर्गामध्ये निवासी क्षेत्राचा समावेश होत असून, डेसिबल्स एलक्यूमधील र्मयादा येथे दिवसाकरिता ५५ व रात्री ४५ , तर ड क्षेत्राच्या प्रवर्गामध्ये शांतता झोन घोषित असलेल्या क्षेत्राचा समावेश हो त असून, डेसिबल्स एलक्यूमधील र्मयादा दिवसाकरीता ५0 व रात्री ४0 अशी ठेवण्यात आली आहे.
ध्वनिप्रदूषणाबाबत तसेच रात्रीच्या ध्वनिक्षेपक सुरू असण्याबाबत काही तक्रार असल्यास, १00 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.