शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी पसार, मुलाकडील मध्यस्थीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 11:56 IST

फसवणूकप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा : जळगाव जिल्ह्यातील घटनेनंतर अटकसत्र

डोणगाव (बुलढाणा) लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी पसार झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे कळताच वधू-वर पक्षाच्या मंडळींमध्ये गोंधळ उडाला. लग्नाआधी दिलेली रक्कम वृधकडील मध्यस्थींकडून परत न मिळाल्याने वराकडील मध्यस्थीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यामध्ये मेहकर, डोणगाव येथील तिघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना २८ सप्टेंबरला अटक केली आहे तर एकजण फरार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील एका मुलाचे दयाराम नारायण चौधरी या समाजातील मध्यस्थी व्यक्तीने लग्न जुळविण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी डोणगाव येथील रसूल रफिक बागवान, मेहकर येथील शफउत खा जब्बर खा पठाण व भुऱ्या (अपूर्ण नाव) यांनी मेहकर येथील एका मुलीचे स्थळ सुचविले होते. डोणगाव येथे पाहणीचा कार्यक्रम झाला. पसंता- पसंती झाल्याने दयाराम चौधरी यांच्याकडून लग्न जुळवून देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपये घेऊन २६ जुलै रोजी पाचोरा येथे लग्न पार पडले. दरम्यान, २८ जुलै रोजी नवरीने शौचास जाण्याचे कारण सांगून पोबारा केला. ती परत आलीच नाही. तेव्हा वधू पक्षाकडील मध्यस्थींना नवरीला आणून द्या, नाहीतर घेतलेले पैसे परत देण्याची मागणी केली; मात्र, डोणगावातील मध्यस्थीने ते देण्यास नकार दिला. याला कंटाळून वर पक्षाकडील मध्यस्थी असलेल्या दयाराम चौधरी यांनी २ ऑगस्ट रोजी शिदांड शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मृताच्या मुलाने दिली पोलिसांत तक्रार याप्रकरणी १४ सप्टेंबर रोजी मृतकाचा मुलगा काशिनाथ दयाराम चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर वधू पक्षाकडील मध्यस्थी असलेल्या शफउत खा जब्बार खा पठाण (रा. मेहकर), रसुल रफिक बागवान (डोणगाव) आणि भुया नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तर २८ सप्टेंबर रोजी शफत खा जब्बार खा पठाण, रसुल रफिक बागवान या दोघांना अटक केली. अद्यापही भुया हा आरोपी फरार आहे.

टॅग्स :marriageलग्नbuldhanaबुलडाणा