नवनिर्वाचित उपाध्यक्षांनी स्वीकारला पदभार
By Admin | Updated: March 24, 2017 01:05 IST2017-03-24T01:05:58+5:302017-03-24T01:05:58+5:30
बुलडाणा, दि. २३- जि.प.च्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा मंगलाताई संतोष रायपुरे यांनी २३ मार्च रोजी आपल्या पदाचा प्रभार घेतला.

नवनिर्वाचित उपाध्यक्षांनी स्वीकारला पदभार
बुलडाणा, दि. २३- जि.प.च्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा मंगलाताई संतोष रायपुरे यांनी २३ मार्च रोजी आपल्या पदाचा प्रभार घेतला. या पदग्रहण समारंभाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राधेश्याम चांडक, माजी आमदार रेखाताई खेडेकर, पक्षाचे कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, पक्ष उपाध्यक्ष नरेश शेळके, माजी उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर तथा राष्ट्रवादीचे सर्व नवनिर्वाचित जि.प. सदस्य उपस्थित होते.